गुरुवार १३ जून २०१३

Ra 1 फालतू डायलॉग व अर्थहीन डायरेक्शन फुटकळ पटकथा


जर्मनीत महिन्याच्या शेवटच्या शनिवारी बॉलीवूड सिनेमे बहुतांशी शाहरूख खान ,चोप्रा जोहर प्रभूतींचे जर्मनीतडब करून दाखवतात. कालच  रा १ हा शिणेमा दाखवला.
तो पाहून एकेकाळी ह्या सिनेमावर व्यक्त केलेले माझे मत आज अनेक दिवसांनी ह्या ब्लॉग वर देत आहे. मधल्या काळात माझा ब्लॉग हिम निद्रेत होता.
आता  जमेल तसे  त्यावर खरडाखरडी करत राहील.
रा १ असा अत्यंत फुटकळ पटकथा असलेला ,सुमार व भिकार अभिनय , अत्यंत फालतू डायलॉग व अर्थहीन डायरेक्शन ( हा सिनेमा २००७ साली बनविण्याचे ठरवले तेव्हा पासून आजतागायत बनलेल्या ह्या सिनेमात अनेक प्रसंगांची ठिगळ लाऊन बनवलेला वाटतो. कथेची मूळ संकल्पना व्हिडीयो गेम  व मुले अशी भन्नाट असली तरी

बुधवार २३ जानेवारी २०१३

सुभाषचंद्र बोसं ह्यांचे जर्मनी मधील वास्तव्य व तेथे केलेले कार्य

नेताजींच्या 116 व्या जयंतीनिमित्त   त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 
 ह्या लेखाच्या खाली दिलेली क्लिप  तमाम  देश भक्तांनी जरूर पहावी.
ह्यात सुभाष चंद्र बोसं ह्यांचे जर्मनी मधील वास्तव्य , आझाद हिंद सेनेची स्थापना व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नाझी  राजवटी सोबत संबंध ह्यावर प्रकाश झोत टाकते.
ह्यात त्यांची जर्मन नागरिकत्व असणारी कन्या अनिता बोसं व नेताजींच्या सोबत काम केलेल्या अनेक जर्मन नागरिकांच्या मुलाखती आहेत.

सोमवार २१ जानेवारी २०१३

भारतीय जवानांचे शीर कलम त्यामागील पाकिस्तानी हतबलता व त्यावर भारताचे अपेक्षित उत्तर

आंतर्राष्ट्रीय राजकारणाची  एक  गंमत आहे.
येथे अंतिम म्हणून असे काही सत्य नसते.
असतात त्या फक्त अनेक शक्यता
ह्यात आपल्याला पचते झेपते ते आपण स्वीकारायचे.भारत व पाकिस्तानच्या मध्ये जवानाच्या मृत देहाच्या विटंबनेच्या मुद्द्यावरून जे काही राजकारण झाले त्यामागील एक शक्यता  थोडक्यात  माझे मत थोडक्यात मांडतो.

शनिवार २९ डिसेंबर २०१२

दामिनी आणि दामिनी

काय  विचित्र योगायोग आहे
फार पूर्वी दामिनी नावाचा मीनाक्षी व ऋषी व सनी चा सिनेमा आला होता ,
दिल्लीच्या बड्या घरात एक मध्यमवर्गीय मुलगी सून म्हणून जाते व तेथे होळीच्या दिवशी घरातील मोलकरणीवर झालेल्या बलात्काराविरूढ एकटी उभी ठाकते व शेवटी तिला न्याय मिळतो. राजकुमार संतोषी ह्या द्रष्ट्या दिग्दर्शकाने  दिल्ली मधील परिस्थितीचा आढावा घेत फार पूर्वी दिल्लीत होणारा बलात्कार व त्या तरुणीस न्याय मिळवून देण्यासाठी दामिनी नावांच्या मध्यमवर्गीय मुलीची संघर्षगाथा ह्या सिनेमातून मांडली, सिनेमा यशस्वी झाला मात्र वास्तविक जीवनातील  परिस्थिती अजिबात बदलली नाही.
ह्या सिनेमांच्या अनेक वर्षानंतर दिल्ली मध्ये दामिनी नावाच्या मुलीवर बस मध्ये बलात्कार होतो , आणि तिचा त्यात मृत्यू सुद्धा होतो ,
तिला न्याय मिळणार का
Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips